Monday, April 1, 2013

internetची नीती आणि facebookची नाती

This is a poem i read in a newspaper
Though not an original one but found it so real in today's age,
That i couldn't resist sharing!

Outdated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दुःख send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
Delete झालेल्या file सारखे
अन् घर आता शांत असतं
Range नसलेल्या mobile सारखे


Hang झालय PC सारखे
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

ऐकविसाव्या शतकातली
पिढी भलतीच 'cute'
Contact list वाढत गेली
संवाद झाले mute

Computerच्या chip सारखा
माणूस मनानं खुझा झालाय
अन  'mother'  नावाचा board
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

Floppy disk drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन् फाटली मन सांधणारा
Internetवर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook....

No comments:

Post a Comment

pls do leave a comment....ur reviews will help me write better!! :)